कडक र्निबध असूनही करोना रुग्णसंख्येत वाढ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नगर : शहरासह जिल्ह्यत कडक र्निबध लागू करण्यात आले असले तरी करोनाबाधितांच्या संख्येत रोजच वाढ होते आहे. आज, बुधवारी उच्चांकी ४ हजार ४७५ नवे बाधित आढळले, तर ३ हजार १०३ रुग्ण करोनामुक्त झाले. गेल्या चोवीस तासात उपचार घेणाऱ्या ९ रुग्णांचा मृत्यू झाला.
आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६६ हजार ३५५ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता ८५.९१ टक्के झाले आहे. आज रुग्ण संख्येत ४ हजार ४७५ ने वाढ झाल्याने उपचारार्थी रुग्णांची संख्या आता २५ हजार ११४ झाली आहे.
आज आढळलेले बाधित पुढीलप्रमाणे— नगर शहर ७६६, नगर तालुका ४६८, संगमनेर ३८६, श्रीगोंदे ३००, पारनेर २८६, श्रीरामपूर २८३, राहता २८१, कर्जत २४४, कोपरगाव २३८, राहुरी २१९, अकोले २०४, नेवस १५६, शेवगाव १५२, पाथर्डी १४४, जामखेड १३६, इतर जिल्ह्यतील १०४, भिंगार ९२, इतर राज्यातील ११ व लष्करी रुग्णालयातील ९. आज करोनामुक्त झालेले पुढीलप्रमाणे—मनपा ५८१, अकोले ४६, जामखेड १०९, कर्जत १२९, कोपरगाव १२३, नगर तालुका २४३, नेवासा ९४, पारनेर २९९, पाथर्डी १७४, राहाता ३०४, राहुरी १७७, संगमनेर २३९, शेवगाव २०३, श्रीगोंदा १८८, श्रीरामपूर १०८, भिंगार ५४, मिलिटरी हॉस्पिटल १२ व इतर जिल्ह्यतील २०.