जनतेच्या त्रासाची जाणिव व चिंता आहे- केंद्र सरकार
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : भारतीय जनतेला कोरोना साथरोगामुळे सोसावा लागणाऱ्या त्रासाची जाणिव आणि चिंता असल्याचे केंद्र सराकारने हायकोर्टात सांगितले. यासंदर्भातील याचिकेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने आपली बाजू मांडतांना उपरोक्त प्रतिपादन केले.
देशभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स, कोरोना लसीची कमतरता जाणवत आहे. ऑक्सिजन कमतरतेमुळे अनेकांचे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात न्या. डी.व्हाय. चंद्रचूड आणि एम. आर. शाह यांच्या द्विसदस्यीय खंडपिठासमोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली. केंद्र सरकारच्यावतीने ऍड. मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, भारतीयांना कोरोनामुळे सहन कराव्या लागत असलेल्या त्रासाची कल्पना आम्हाला आहे. देशातील जनतेने दोनदा आम्हाला निवडून दिलं आहे. आम्हाला लोकांना होत असणाऱ्या त्रासाची जाणीव असून त्यांची काळजी आम्हालाही वाटते, असं केंद्र सरकारने सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. तसेच आम्ही ऑक्सिजनचा पुरवठा पुरेश्या प्रमाणात करण्यासाठी राजकीय स्तरावर उच्च पातळीवर प्रयत्न सुरु असल्याची माहिती देखील केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. केंद्र सरकार केवळ दिल्लाचा विचार करत नसून संपूर्ण देशाचा विचार करत असल्याचं मेहता यांनी सांगितले. हा विषय वाद घालण्याचा नसल्याचे सांगूनही दिल्ली सरकारने हा वाद केंद्र विरुद्ध दिल्ली सरकार असा करुन ठेवल्याचा आरोपही मेहता यांनी सरकारची बाजू मांडताना केला. आम्हाला देशभरातील सर्वच ठिकाणांहून होणाऱ्या मागणीचा विचार करावा लागतो, असेही सरकारच्यावतीने मेहता यांनी स्पष्ट केले.दिल्ली सरकारने उच्च न्यायालयात केंद्रावर आरोप करत ऑक्सिजन पुरवठा योग्य पद्धतीने केला जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र, हा आरोप फेटाळत दिल्लीला 12 जादा ऑक्सिजन टँकर पुरवले असल्याचे केंद्राच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.