'राधे'ची पायरसी करणा-यांवर केली जाणार कडक कारवाई
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
सलमान खान स्टारर 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट 13 मे रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये आणि OTT-DTH यावर 'पे पर व्यू' सेवे अंतर्गत प्रदर्शित झाला. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही तासांतच इंटरनेटवरही लीक झाला होता. 'राधे'चे पायरेटेड व्हर्जन बर्याच टॉरेंट साइट्स, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम अॅपवर अपलोड केले गेले. आता अलीकडेच सलमान खानच्या मॅनेजरने मुंबईतील सायबर पोलिस स्टेशनमध्ये ‘राधे’च्या पायरसी विरोधात लेखी तक्रार दिली आहे.
तर एक दिवसाआधीच सलमान खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत 'राधे'ची पायरसी करणा-यांना कडक इशारा दिला होता. सायबर सेल आता त्या ऑनलाइन साइट्सच्या सोर्सचा मागोवा घेत आहे, ज्याद्वारे चित्रपटाची पायरेटेड आवृत्ती बर्याच लोकांनी अपलोड आणि डाउनलोड केली आहे. एका अधिका-याने सांगितले की, "ZEE ने सायबर सेलमध्ये लेखी तक्रार दिली आहे. व्हॉट्सअॅपवर व टेलीग्रामसह इतर मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार्या 'राधे' चित्रपटाच्या पायरेटेड आवृत्तीशी संबंधित प्रकरणाची चौकशी सायबर सेल करीत आहे." या प्रकरणात डीसीपी (सायबर) रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या नवीन चित्रपटाच्या पायरीसबद्दल त्यांच्याकडे लेखी तक्रार आली आहे. करंदीकर म्हणाल्या, “आम्ही प्राप्त झालेल्या तक्रारीचा तपास सुरू केला आहे आणि आमची टीम चित्रपटाचे पायरेटेड व्हिडिओ अपलोड केलेल्या साइटच्या सोर्सचा मागोवा घेईल.”