भाजप नेते पंतप्रधान मोदींचे ऐकत नाहीत - नवाब मलिक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई: कोरोनाचे संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिका घेत आहेत. मात्र, याला विरोध करुन भाजप नेते मोदींचे पण ऐकत नाहीत हे सिद्ध होत असून हे जनहितासाठी की मतासाठी आहे याचे उत्तर तेच देऊ शकतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. भाजपचे नेते लोकल ट्रेन सर्वसाधारण लोकांसाठी सुरू व्हावी म्हणून व मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सणासुदीला गर्दी होणार असल्याने चिंतेत आहेत. त्यांनी त्याचपध्दतीने काळजी घेण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत.
तर, दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येईल तसतशी अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे अगोदरच सांगितले आहे. मात्र, याउलट भाजप नेते वागत असून मंदिरे उघडण्यासाठी व लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी आंदोलने करत आहेत. या दुटप्पी भूमिकेबद्दल नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.