अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी पर्ल व्ही. पुरीचा जामीन अर्ज दुस-यांदा फेटाळला
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
'नागीन 3' फेम अभिनेता पर्ल व्ही. पुरीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. पर्लने 5 जून रोजी वसई कोर्टात जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. परंतु कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळला होता. पर्लने पुन्हा कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली आणि यावेळीसुद्धा त्याच्या पदरी निराशा पडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 15 जून रोजी होईल.
पीडितेच्या वडिलांनी खुलासा करत पर्लची ओळख स्वतः त्यांच्या मुलीनेच सांगितल्याचे म्हटले आहे. पीडत मुलगी तिच्या आईसोबत मालिकेच्या सेटवर येत असे. पीडितेच्या आईने पर्लसोबत एका मालिकेत एकत्र काम केले होते. त्यावेळी सेटवर आलेल्या या मुलीवर 31 वर्षीय पर्ल व्ही पुरीने व्हेनिटी व्हॅनमध्ये बलात्कार केल्याचा आरोप आहे. मुलीच्या वडिलांच्या एफआयआरनंतर पर्लला अटक करण्यात आली आहे. तर पीडितेच्या आईने मात्र पर्लला निर्दोष सांगितले आहे.
पर्लने 'नागिन 3' सोबतच 'दिल की नजर से खूबसूरत', 'फिर भी ना माने बदतमीज दिल', 'मेरी सासू मां', 'नागार्जुन एक योद्धा', 'बेपनाह प्यार' आणि 'ब्रह्मराक्षस 2' या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.