जबराट फॅनकडून सोनू सूदला हटके सोल्यूट
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या वर्षभरापासून करोना काळात गरीब, गरजू आणि अडचणीत आलेल्या लोकांच्या
मदतीसाठी धडपड करत आहे. त्यानंतर तो जगभरात चर्चेत आला. त्याला गरिबांचा ‘मसीहा’ देखील म्हणतात.
सोनू सूद अजूनही लोकांच्या मदतीसाठी नेहमी पुढे असतो. सोनू सूदने कशाचीही पर्वा न करता लोकांना भरभरून
मदत केली. त्यामुळे करोना काळात त्याचं सुरू असलेलं काम पाहून आता जगभारातून त्याचे फॅन्स तयार झाले
आहेत. अनेक स्तरातून त्याचं कौतूक केलं जातंय. नुकतंच त्याच्या एका जबराट फॅनने भिंतीवर त्याचं चित्र
रेखाटून अनोख्या पद्धतीने त्याला सोल्यूट ठोकलाय. सोनू सूदच्या या फॅनचा एक व्हिडीओ सध्या सोशल
मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.
सोमिन जैन असं या जबराट फॅनचं आहे. तो जबलपूरमधल्या सराफा इथे राहणारा असून तो फाईन आर्टचा
विद्यार्थी आहे. तो राहत असलेल्या घरातील छताच्या भिंतीवर त्याने सोनू सूदचं हे चित्र रेखाटलंय. जवळजवळ
गेल्या १५ दिवसांपासून सोमिन प्रत्येक दिवसातले दोन तास या वॉल पेंटींगसाठी देत होता. करोना काळात
अभिनेता सोनू सूद अगदी देवदूताप्रमाणेच गरजूंची विविधप्रकारे मदत करतोय, यासाठी त्याने मागचा पुढचा
विचार न करता आपली स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून गरिबांसाठी ऑक्सिजन आणि उपयोगी वस्तूंचा पुरवठा
सुरू ठेवला. म्हणूनच त्याला सोल्यूट करण्यासाठी या अवलिया कलाकारने हे वॉल पेंटिग साकारले आहे.