धावपटू मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
चंदीगड, : दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांची प्रकृती आता स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच त्यांच्या पत्नी निर्मल कौर या ऑक्सिजनवर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांना मोहालीच्या फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यांना न्यूमोनियाची लागण झाल्याचेही डॉक्टरांनी सांगितले होते. सध्या मिल्खा सिंग आणि त्यांच्या पत्नीला एकाच रुममध्ये ठेवले असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.