अनिल देशमुख ‘ईडी’ चौकशीसाठी गैरहजर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याच्या कारणास्तव अनिल देशमुख आणि मुलगा हृषीकेश हे सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी गैरहजर राहिले.
बार आणि हॉटेलमालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये खंडणीवसुली करण्यास सांगितल्याचा आरोप बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय आणि नंतर ईडीने देशमुखांविरोधात तपास सुरू केला आहे. देशमुख पितापुत्रांनी सोमवारी सकाळी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत चौथे समन्स बजावण्यात आले होते.
आपण तपासाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली असून त्यावर ३० जुलैला सुनावणी होऊन पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. त्यादरम्यान ईडीने समन्स बजावण्यास देशमुख यांनी आक्षेप घेतला आहे.