अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली: आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात कठोर कारवाई केली जाऊ नये, यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी देशमुख यांना समन्स जारी करून ५ जुलै रोजी दक्षिण मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे असे सांगितले होते. ईडीने देशमुख यांना आतापर्यंत ३ नोटिसा जारी केल्या आहेत. या प्रकरणात कठोर कारवाईपासून आपल्याला संरक्षण मिळावे, याकरता ७२ वर्षांचे देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असल्याचे त्यांचे मुंबईतील वकील इंदरपाल सिंग यांनी सांगितले.