भारतात 24 तासात 1,96,427 नवे कोरोना रुग्ण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, 25 मे (हिं.स) : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 1,96,427 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 3,511 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 3,26,850 नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे 2,69,48,874 रुग्ण झाले असून एकूण 2,40,54,861 नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 25,86,782 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 3,07,231 आहे.
आतापर्यंत देशात 19,85,38,999 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 20,58,112 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 33,25,94,176 चाचण्या घेण्यात आल्या.