मुंबईसह देशभरातील रेल्वेने मान्सूनसाठी पूर्णपणे तयार असणे आवश्यक - पीयूष गोयल
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : पावसाळ्यातील मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तयारी व सर्व उपाययोजनांबाबत आढावा घेताना, पावसाळ्यात भारतातील आणि मुंबईतील रेल्वेने पूर्णपणे तयार असणे आवश्यक आहे असे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. गोयल यांनी गुरुवारी धोकादायक क्षेत्रांची/ठीकाणांची सद्यस्थिती तपासली व गाड्यांच्या सुरळीत कामकाजाच्या योजनांचा आढावा घेतला. गोयल म्हणाले की, पावसाळा सुरू होताच मुंबईकरांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यासाठी रेल्वे वचनबद्ध आहे. उपनगरीय रेल्वेच्या सज्जतेचा आढावा घेताना मंत्र्यांनी मान्सूनचा पाऊस हाताळण्यासाठी रेल्वेच्या तांत्रिक आणि नागरी कामांच्या उपक्रमांच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबईसारख्या संस्थांशी चर्चा करून मदत घेण्याचा सल्ला रेल्वेला दिला. ते म्हणाले की, रेल्वे सेवा सुरळीत आणि अखंडितपणे सुरू राहतील हे सुनिश्चित करण्यासाठी नाविन्य आणि कठोर परिश्रम एकत्र असले पाहिजेत. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, कोविड साथीच्या वेळीही रेल्वेने विशेषतः मुंबईत विशेष सुधारित 6 मक स्पेशलसह उपनगरातील विभागातून 3,60,000 घन मीटर कचरा / जमिनीवरून साफ केला आहे. ट्रॅकवर पडणारा कचरा रोखण्यासाठी महानगरपालिकांशी समन्वय साधण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले आहेत. मागील पावसाळ्यातील पाणी तुंबलेल्या ठीकाणांचा अभ्यास करण्यात आला आणि वांद्रे, अंधेरी, माहीम, ग्रँट रोड, गोरेगाव, सैंडहस्ट रोड, कुर्ला इ. प्रत्येक जागेसाठी अनुकूलित उपाय तयार करण्यात येत आहेत असे सांगितले. रिअल टाइम आणि पावसाचा सुयोग्य डेटा मिळावा यासाठी आयएमडी व पश्चिम रेल्वेने एकत्रितपणे चार ठीकाणी व पश्चिम रेल्वेने स्वतंत्रपणे दहा ठीकाणी व स्वयंचलित रेन गेज (एआरजी) स्थापित केले आहेत. ट्रॅक आणि डेपोवर पुरविल्या जाणा-या सीवरेज आणि सबमर्सिबल पंपांची संख्या ३३% वाढवली आहे. बोरीवली- विरार विभागात झालेल्या नाल्याची साफसफाईची पाहणी व देखरेखीसाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. पुष्कळशा सखल भागातील साफसफाईची खात्री करण्यासाठी सक्शन / डी-स्लझिंग मशीन वापरण्यात येत आहे. पाणी तुंबणे कमीत कमी व्हावे यासाठी नाल्यांचे बांधकाम करताना नवीन मायक्रो टनेलिंग पद्धतीचा अवलंब केला गेला. या बैठकीला रेल्वे बोर्ड आणि मुंबईचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.