भगवान जगन्नाथ यांच्या १४४ व्या रथ यात्रेस गुजरात सरकारची मंजूरी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
करोना साथीच्या काळात अहमदाबादमधील भगवान जगन्नाथ यांची १४४ वी पारंपारिक रथ यात्रा निघणार आहे. यावेळी कर्फ्यू लावण्यात येणार आहे. यात्रेत केवळ ३ रथ आणि २ वाहने असतील. १९ किमी मार्गासाठी रथ यात्रेला परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रसाद वाटप होणार नाही. गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंग जडेजा यांनी याबाबत माहिती दिली.
गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंग जडेजा म्हणाले की, कोविड प्रोटोकॉलते पालन करत रथयात्रा आखाडा, भजन मंडळाशिवाय दुपारपर्यंत निघेल. लोकांचा भगवान जगन्नाथांवर खूप श्रद्धा आणि विश्वास असल्याचे जडेजा म्हणाले. करोनामुळे गेल्यावर्षी रथयात्रा निघू शकली नाही. दरम्यान, आता राज्यातील कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रित आली आहे. त्यामुळे करोना निर्बंधांचे पालन करत रथयात्रा काढण्यात येईल.
एसआरपीच्या २० तुकड्या तैनात
“रथ यात्रा १२ जुलै रोजी सकाळी निज मंदिर येथून सुरू होईल आणि सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत पूर्ण होईल. या वेळी भाविकांना रथ यात्रेमध्ये भाग घेता येणार नाही. त्याचवेळी लोक दूरदर्शन व टीव्ही वाहिन्यांमधून रथ यात्रेचे दर्शन घेऊ शकतात. तसेच रथ यात्रेच्या सुरक्षेसाठी एसआरपीच्या २० तुकड्या तैनात असतील.” असे, जडेजा म्हणाले.
अमित शहा यात्रेत सहभागी होऊ शकतात
केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा १२ जुलैला भगवान जगन्नाथ यात्रेदरम्यान मंगळा आरतीस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी रथ यात्रेसंदर्भात बुधवारी कोअर कमिटीची बैठक घेतली. या दरम्यान, लोकांचा विश्वास आणि श्रद्धा लक्षात घेता करोना मार्गदर्शक सूचनांसह रथयात्रा काढण्यास मंजूरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.