परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ जयशंकर तीन देशांच्या दौऱ्यावर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर 10-13 ऑक्टोबर या काळात किर्गिस्तान, कझाकिस्तान आणि आर्मेनियाच्या या तीन देशांच्या दौऱ्यावर असणार आहे.
किर्गिस्तानमध्ये डॉ सुब्रमण्यम जयशंकर किर्गिस्तानचे राष्ट्रपती आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री यांची भेट घेतील.11-12 ऑक्टोबर दरम्यान जयशंकर कझाकिस्तानमध्ये असतील. ते आशियात नूर-सुलतान येथे परस्परसंवाद आणि आत्मविश्वास निर्माण उपाय या विषयी आयोजित सहाव्या मंत्री परिषदेत भाग घेतील.12-13 ऑक्टोबर दरम्यान जयशंकर आर्मेनियाच्या प्रथम आणि अधिकृत दौऱ्यावर असणार आहे. यावेळी डॉ सुब्रमण्यम जयशंकर स्वतंत्र आर्मेनियाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहार मंत्री सहित विविध मान्यवरांची भेट घेतील.परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती दिली.