प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा देशभरात नागरिकांना मोठा दिलासा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा देशभरात नागरिकांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावटात 24 मे  पर्यंत एफसीआयने सर्व 36 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना 48 लाख मे. टन मोफत धान्य पुरवठा केला आहे. कोविड महामारी काळात  25 मार्च 2020 पासूनएफसीआयने विविध सरकारी योजनांतर्गत एकूण 1062 लाख मे टन धान्य दिले आहे. नियोजन केले  आहे. वाटप केलेला साठा उचलल्यावर तो पुन्हा  नियमितपणे  भरला जातो  जेणेकरून

देशात धान्य पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी एफसीआयने वाहतुकीबाबत  आगाऊ सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशात पुरेसे अन्नधान्य उपलब्ध राहील. मे 2021 दरम्यानएफसीआयने यापूर्वीच 1062 रेक्स  म्हणजेच दररोज  सरासरी 44 रेक्स पाठवले आहेत.  सध्या केंद्रीय साठयाअंतर्गत  295 लाख मे टन गहू आणि 597 लाख मे टन तांदूळ (एकूण 892 लाख मे टन) धान्य उपलब्ध आहे.  गरीबांसाठी उपक्रम म्हणूनप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (पीएमजीकेएआय) केंद्र  सरकार दोन महिन्यांच्या कालावधीसाठी  (मे-जून 2121) प्रत्येक व्यक्तीला दरमहा 5 किलो धान्य वितरित  करत आहे. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा  अंतर्गत 79.39 कोटी लाभार्थी आहेत. हे वाटप नियमित एनएफएसए वाटपाव्यतिरिक्त आहे आणि या योजनेअंतर्गत 79.39 लाख मे टन  अन्नधान्य देण्यात येणार आहे.