दिल्ली सरकारने चारपट अतिरिक्त ऑक्सिजन मागितला
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : दिल्ली सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आवश्यकतेहून अधिक ऑक्सिजनची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या ऑक्सिजन ऑडिट कमिटीच्या चौकशीत ही बाब पुढे आल्याची माहिती भाजप नेते डॉ. संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भात डॉ. पात्रा यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या ऑक्सिजन ऑडिट कमिटीने मे महिन्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पीकदरम्यान दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा आणि वापर यामध्ये मोठा गोंधळ झाल्याचा दावा केलाय. देशाच्या राजधानीमध्ये करोना पीकच्या कालावधीमध्ये वापर करण्यात आलेला ऑक्सिजन आणि वापर झाल्याचा दावा करण्यात आलेल्या ऑक्सिजनच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत कमिटीला आढळून आलीय. दिल्ली सरकारने गरजेपेक्षा चार पट अधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा या कमिटीने केलाय. सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेल्या अहवालामध्ये दिल्ली सरकारने 1400 मेट्रीक टन ऑक्सिजन वापरण्यात आल्याचा दावा केला असला तरी ही आकडेवारी प्रत्यक्षात वापरण्यात आलेल्या ऑक्सिजनच्या चौपट असल्याचे म्हटले आहे. बेड उपलब्धतेच्या सुत्रानुसार हा गोंधळ दिसून येत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दिल्लीमधील बेड्सच्या उपलब्धतेनुसार 289 मेट्रीक टन ऑक्सिजन वापरला गेल्याचे सांगण्यात आलेय. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील ऑक्सिजन ऑडिटसाठी तयार केलेल्या उपविभागाच्या चौकशीदरम्यान प्रत्यक्ष वापरण्यात आलेल्या आणि आकडेमोड केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजन वापरामध्ये मोठी तफावत आढळून आली. आधीचा (1400 मेट्रीक टनचा) दावा हा प्रत्यक्षात नंतरच्या दाव्यापेक्षा (289 मेट्रीक टन) चारपट अधिक आहे, असे अहवालात म्हटले आहे. याच अहवालामध्ये पुढे दिल्लीतील चार रुग्णालयांमध्ये ज्यात सिंघल, आर्यन असफ अली, ईएसआयसी मॉडेल अॅण्ड लाइफरेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याचे म्हटले आहे. या रुग्णालयांमध्ये खूप कमी प्रमाणात बेड असूनही अधिक ऑक्सिजन वापरण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. हा आकडेवारीवरुन दिल्लीमध्ये ऑक्सिजन वापराची चुकीची माहिती दिल्याचं आणि अधिक वापर झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार 183 रुग्णालयांमधील प्रत्यक्षात ऑक्सिजनचा वापर हा 1140 इतका होता असा दावा करण्यात आला असला तरी सर्व आकडेमोड केल्यानंतर 4 रुग्णालयांनी चारपट अधिक ऑक्सिजन वापरल्याचे आकडे दाखवल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात 209 मेट्रीक टन ऑक्सिजन वापरण्यात आलाय, असे या अहवालात म्हटले आहे.
हिंदुस्थान समाचार