गडचिरोली चकमकीतील सर्व 13 मृतक नक्षल्यांची ओळख पटली
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
गडचिरोली : एटापल्ली पोलीस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या कोटमी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत पयडी जंगल
परिसरात काल सकाळच्या सुमारास घडलेल्या चकमकीत 13 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस
दलास यश आले. त्या 13 ही मृत नक्षल्यांची ओळख पटली असून त्यात 6 पुरूष व 7 महिला नक्षलींचा समावेश
आहे. सर्व मृतक नक्षल्यांवर एकुण 60 लाखांचे बक्षीस शासनाने जाहीर केले होते.
यात एक डिवीजनल कमिटी सदस्य, 2 एरिया कमिटी सदस्य, 1 ऊपकमांडर, 1 प्लाटून पार्टी कमिटी सदस्य, 7
पार्टी सदस्य व 1 जनमिलिशियाचा समावेश आहे. यात सतीश उर्फ अडवे देवु मोहंदा हा कंपनी क्रमांक 4 मध्ये
विभागिय समिती सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावर शासनाने 16 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
नंदिनी उर्फ प्रेमबत्ती मडावी कसनसूर स्थानिक संंघटन पथकामध्ये क्षेत्रीय समिती सदस्य या पदावर कार्यरत होती.
तिच्यावर शासनाने 6 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. किशोर ऊर्फ शिवा ऊर्फ शिवजी कंपनी क्रमांक 4 मध्ये
दलम सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावर शासनाने 4 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते, रूपेश उर्फ लींगा
मस्तारी गावडे हा कसनसूर स्थानिक संंघटन पथकामध्ये उपकंमाडर पदावर होता. त्याच्यावर 6 लाख रूपयांचे
बक्षीस होते. सेवंती हेडो ही कसनसुर स्थानिक संंघटन पथकामध्ये पार्टी मेंबर या पदावर कार्यरत होती. तिच्यावर
2 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होेते. किशोर होळी हा पयडी एरीया समिति मध्ये जनमिलीशिया पदावर
कार्यरत होता. त्याच्यावर 2 लाख रूपयांचे बक्षीस शासनाने जाहीर केले होते. क्रांती उर्फ मैना उर्फ रीना माहो
मट्टामी ही कसनसूर स्थानिक संंघटन पथकामध्ये दलम सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर 2 लाखांचे
बक्षीस होते. गुनी उर्फ बुकली धानु हिचामी ही कंपनी क्रमांक 2 मध्ये प्लाटून पार्टी कमिटी सदस्य पदावर कार्यरत
होती. तिच्यावर 4 लाखांचे बक्षीस होते, रजनी ओडी ही कसनसुर एलओएस मध्ये दलम सदस्य पदावर कार्यरत
होती. तिच्यावर 2 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. उमेश परसा हा कसनसुर स्थानिक संंघटन
पथकामध्ये एरिया कमिटी सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावर शासनाने 6 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
सगुना उर्फ वसंती उर्फ वत्सला लालु नरोटे ही चातगांव दलम मध्ये कार्यरत होती. तिच्यावर 2 लाखांचे बक्षीस होते.
सोमरी उर्फ सुनिता उर्फ सविता पापय्या नैताम ही कसनसुर स्थानिक संंघटन पथकामध्ये सदस्य पदावर कार्यरत
होती. तिच्यावर शासनाने 6 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. रोहीत उर्फ मनेश उर्फ मानस उर्फ सोनारू सन्नु
कारामी हा कसनसुर स्थानिक संंघटन पथकामध्ये सदस्य होता. त्याच्यावर शासनाने 2 लाखांचे बक्षीस जाहीर केले
होते. सर्व मृतक नक्षल्यांवर एकुण 60 लाखांचे बक्षीस शासनाने जाहीर केले होते.
मृतक नक्षल्यांवर खुन, जाळपोळ, चकमक इत्यादी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तसेच यात 1 एके 47, रायफल,
5 एसएलआर रायफल, 1 स्टेनगन, 303 रायफल, 8 एमएम बंदुक 2 , 1 पिस्तल इत्यादी भरपूर प्रमाणात स्फोटके
मिळुन आले. तसेच नक्षल्यांचे दैनंदिन जिवनात वापरात येणारे साहित्य सापडले.