मुंबईतील तीन आमदार घेत आहेत नगरसेवक पदाचे मानधन
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई दि. २६ मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक असलेल्या लोकप्रतिनिधी यांनी आमदार व खासदार बनल्यानंतर एकाच सभागृहाचे मानधन घेणे नैतिकदृष्ट्या अपेक्षित आहे परंतु आमदार बनलेल्या पराग शाह,रईस शेख,दिलीप लांडे हे नगरसेवक महानगरपालिकेचे मानधन सुद्धा घेत असल्याची बाब माहिती अधिकारात पुढे आली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना महानगरपालिकेच्या चिटणीस खात्याने ही माहिती दिली आहे.
गलगली यांस चिटणीस खात्याकडे माहिती मागितली होती की,सद्यस्थितीत जे नगरसेवक आमदार आणि खासदार झाले आहे त्याची माहिती देताना नाव,वेतन व भत्ता अशी एकूण रक्कम घेत नसल्यास त्याची माहिती देण्यात यावी. चिटणीस खात्याने गलगली यांस कळविले की खासदार मनोज कोटक आणि आमदार रमेश कोरगावकर मानधन घेत नाहीत. तर आमदार रईस शेख, पराग शहा आणि दिलीप लांडे यांस दरमहा 25 हजार मानधन तर महापालिकेच्या प्रत्येक सभेकरिता 150 रूपयांचा भत्ता दिला जातो.गलगली यांच्या मते राजकीय पक्षाने जे नगरसेवक आमदार आणि खासदार बनले आहे त्या ठिकाणी राजीनामे घेणे आवश्यक होते पण दुर्दैवाने कोठल्याही राजकीय पक्षाने निर्णय घेतला नाही. अश्या परिस्थितीत कमीत कमी मानधन न घेण्याची सूचना करणे आवश्यक होते.