भारतात सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणं म्हणजे…; दिया मिर्झाने व्यक्त केली खंत
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने काही महिन्यांपूर्वी आई झाली आहे. दियाने एका मुलाला जन्म दिला आहे. आता दियाने सार्वजनीक ठिकाणी स्तनपान करताना येणाऱ्या आव्हानांविषयी वक्तव्यं केलं आहे. नुकत्याच आई झालेल्या स्त्रीयांना स्तनपान करण्यासाठी सुरक्षित जागा नाही आणि सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करायला लाज वाटते तर त्यांच्यावर कमेंट केल्या जातात, असे दिया म्हणाली आहे.
नुकतीच दियाने जागतिक स्तनपान आठवड्याच्या निमित्ताने ‘मिड-डे’ला मुलाखत दिली. “ज्या स्त्रीया नुकत्याच आई झाल्या आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी जागा नसल्याबद्दल मला आता जाणवलं आहे. खासकरून जेव्हा ते सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील तेव्हा त्यांच्यावर याचा जास्त परिणा होतो. मग, या गोष्टीवर आपण कधी बोललो का नाही?, एका आईसाठी गुपचूप कुठे बांधकाम होत असलेल्या ठिकाणी, शेतात आणि रस्त्याच्याकडेला कुठे तरी प्रायव्हसीशिवाय स्तनपान करणे कठीण आहे,’ असे दिया म्हणाली.
पुढे दिया मिर्झा म्हणाली, ‘बेल्जियममध्ये सार्वजनिक ठिकाणी स्तनपानाला कायद्याचे संरक्षण आहे. पण, आपल्याकडे स्तनपानाविषयी समाजामध्ये मानसिक बदल घडवून आणण्याची गरज आहे. लहान बाळाला स्तनपान करने ही नैसर्गिक कृती असल्याचे मान्य करायला पाहिजे. मात्र, जेव्हा सार्वजनिक ठिकाणी स्तनपान केले जाते तेव्हा या कृतीला लाजिरवाण असल्याचे ठरवतं त्यावर मतं मांडली जातात.’