विरारमधील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेवर दरोडा; महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
विरार : विरारमधील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेवर गुरुवारी रात्री दरोडा टाकण्यात आला. या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोन महिला कर्मचारी जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका दरोडेखोराला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री बँक बंद झाल्यावर इतर कर्मचारी निघून गेले तर बँकेच्या असिस्टंट मॅनेजर आणि इतर दोन कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दोन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यात दोन महिला कर्मचारी जखमी झाल्या. दरोडेखोर हे सोने आणि पैशाची बॅग घेऊन फरार होत होते. मात्र, बँकेत झालेल्या गोंधळ ऐकून नागरिक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी एका दरोडेखोराला पकडले. अटक करण्यात आलेला दरोडेखोर हा बँकेचाच माजी कर्मचारी असल्याची सांगण्यात येत आहे.