ऑलिम्पिकमधील अपयशातून धडा घेतला -विनेश

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ऑलिम्पिकमधील अपयशातून धडा घेतला -विनेश

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील अपयशाचा विचार करण्यापेक्षा मी भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज आहे, असे भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने सांगितले. ऑलिम्पिकसारख्या खेळासाठी संघासोबत एक क्रीडा मानसशास्त्रज्ञ देखील असावा; जेणेकरून खेळाडूंना पराभवातून बाहेर पडण्यास मदत मिळेल, असे युवा कुस्तीपटू अंशू मलिकने सुचवले आहे.

टोक्योतील ऑलिम्पिकमधील धक्कादायक पराभवाबाबत विनेश म्हणाली, ‘‘मला बरेच काही शिकायला मिळाले. हे माझे दुसरे ऑलिम्पिक होते. पहिल्या ऑलिम्पिकमध्ये मला दुखापत झाली होती. मात्र आता झालेला पराभव मला मान्य करावा लागेल. आगामी स्पर्धामध्ये माझ्यातील उणिवा दूर करण्यावर लक्ष केंद्रित करीन. या स्पर्धेचे दु: व्यक्त करण्यासाठी वेळ नाही. कारण पुढील ऑलिम्पिक जवळ येत असून, त्यासाठी बऱ्याच स्पर्धाची आव्हाने आहेत.’’