अनिरूद्ध दवेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ;

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अनिरूद्ध दवेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ;

शक्ति: अस्तित्व के एहसास की’, ‘यारों का टशन’ आणि ‘पटियाला बेब्स’ यासारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला अभिनेता अनिरूद्ध दवेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या अभिनेता अनिरूद्धचा करोनाशी लढा सुरू होता. अखेर त्याने आज करोनावर यशस्वी मात केलीय. अभिनेता अनिरूद्ध दवे हा मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये वेब शोसाठी शूटिंगमध्ये होता. त्यानंतर 23 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याने त्याला भोपाळच्या एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या फुप्फुसात ८० ते ९० टक्के इन्फेक्शन झालं होतं. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याच्या फुप्फुसातील इन्फेक्शन रोखण्यासाठी डॉक्टरांची धडपड सुरू होती