सिमरन-विपाशा उपांत्य फेरीत, यश-पाटील आणि अनिरुद्धची कांस्यपदकासाठी लढत
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
युवा भारतीय कुस्तीपटू सिमरनने रशियाच्या उफा येथे सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५० किलो गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. सिमरनने उपांत्यपूर्व फेरीत अझरबैजानच्या गुलताकिन शिरीनोव्हाचा पराभव केला. याआधी सिमरनने रोमानियाच्या जॉर्जियाना लाविनिया अँटुकाचा पराभव केला होता. त्याचबरोबर बिपाशाने कझाकिस्तानच्या दिलनाझ मुल्किनोवाचा ६-३ असा पराभव करत ७६ किलो गटात उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले.
दरम्यान, पुरुषांच्या फ्रीस्टाइल स्पर्धेत यशने ७४ किलो गटात आर्मेनियाच्या आर्मेन मुसिक्यानचा ९-२ असा पराभव करत कांस्यपदक लढतीत स्थान मिळवले. पृथ्वीराज पाटील (९२ किलो) आणि अनिरुद्ध (१२५ किलो) यांनीही कांस्यपदक लढतीत आगेकूच केली. पृथ्वीराज पाटीलने उझबेकिस्तानच्या मुहम्मद राखिमोवचा पराभव केला तर अनिरुद्धने हंगेरीच्या सबा उबोर्नियाकचा पराभव केला. दुसरीकडे, सिटो (५५किलो), कुसुम (५९किलो) आणि अर्जु (६८किलो) यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.