मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत नीरज चोप्राचा सत्कार करण्याचा ठराव; छत्रपती संभाजारीजेंच्या उपस्थितीत निर्णय
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मराठा क्रांती मोर्चाची आज पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला खासदार छत्रपती संभाजारीजे संबोधित करणार आहेत. दरम्यान, या बैठकीला सुरवात झाली असुन मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत नीरज चोप्राचा सत्कार करण्याचा ठराव मांडण्यात आला. भारताच्या नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरी पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.
“रोड मराठा नीरज चोप्राने ही कामगिरी केली आहे. प्रामुख्याने पाणीपत लढाईसाठी गेलेल्या मराठा समाजाच्या वंशजांना आज रोड मराठा म्हणून ओळखल्या जाते. अश्या हरयाणा स्थित मराठा समाजात जन्मलेल्या नीरज चोप्रा याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अभिनंदन,” असे फलक बैठकीत लावण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्र राज्य सरकारने नीरज चोप्राचा सत्कार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नीरजच्या या पराक्रमानंतर त्यांच्यासंदर्भात इंटरनेटवर अनेक गोष्टी सर्च केल्या जात अशतानाच नीरज चोप्रा रोड मराठा असल्याचंही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचसंदर्भात मागोवा घेतला असता ‘हिंदुस्थान टाइम्स’ला नीरजने दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये एक उल्लेख सापडतो. या मुलाखतीच्या सुरवातीलाच नीरज हा रोड मराठा असल्याचा उल्लेख आहे. “काही शतकांआधी त्याचे (नीरजचे) पूर्वज हरयाणामध्ये स्थलांतरीत झाले. बाजीराव पेशव्यांनी पानिपतमध्ये लढलेल्या तिसऱ्या लढाईमध्ये ते लढले होते. नीरज हा याच रोड मराठ्यांचा वंशज असून भालाफेक या पूर्वापार चालत आलेल्या कौशल्याच्या मदतीने तो आपल्या पूर्वजांची परंपरा पुढे नेत आहे,” असं म्हटलं आहे.