इंग्लंड वनडे संघात कोरोनाचा शिरकाव; सात जण पॉझिटिव्ह
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवारपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. परंतु, त्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाला असून तीन खेळाडू आणि चार सपोर्ट स्टाफ सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना क्वारंटाईन होणे भाग पडले आहे. मात्र, असे असले तरी पाकिस्तानविरुद्धची मालिका ठरल्याप्रमाणेच होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना गुरुवारी कार्डिफ येथे खेळला जाईल. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) नव्या संघाची घोषणा करणार असून बेन स्टोक्स या संघाचे नेतृत्व करेल. श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा एकदिवसीय सामना रविवारी ब्रिस्टल येथे पार पडला. त्यानंतर इंग्लंड संघाच्या सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. सोमवारी या चाचणीचे आल्यावर तीन खेळाडू आणि चार सपोर्ट स्टाफ सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 'आता डेल्टा व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच बायो-बबलचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो हे आम्ही जाणतो,' असे ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले.