फरार व्यापारी मेहुल चोक्सी अखेर अटकेत
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : पंजाब नॅशनल बँकेचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला अटक करण्यात डॉमिनिका या देशातील पोलिसांना यश मिळाले आहे. लवकरच त्याला अँटिगुआच्या पोलिसांच्या ताब्यात सोपवले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज बुडवून नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी हे दोघेही फरार झाले. त्यानंतर त्यांचा शोध सुरू झाला. मेहुल २०१८ मध्येच भारतातून फरार झाला होता. पण त्याआधी त्याने २०१७ मध्येच त्याचे कॅरेबियन बेटांच्या समुहतील अँटिगुआतल्या बारबुडाची नागरिकता मिळवली होती. आणि अडचणीत वाढ होताच त्याने अँटिगुआला पलायन केले. तर नीरव मोदी इंग्लंडच्या तुरुंगात आहे. नीरवला भारतात आणण्यासाठी इंग्लंडच्या न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
मेहुल अँटिगुआ येथे लपल्याची माहिती भारताला मिळाली होती. पण तीन दिवसांपूर्वी तो तिथून गायब झाल्याचे वृत्त आले. नीरव आणि मेहुल विरोधात इंटरपोलने भारताच्या मागणीनंतर रेड कॉर्नर नोटीस काढली होती. नोटीस आधारेच नीरवला इंग्लंडमध्ये अटक झाली. पण मेहुल चोक्सी अँटिगुआ येथून फरार झाला. याबाबत माहिती मिळताच त्याचा शोध सुरू झाला. अखेर डॉमिनिका या देशात स्थानिक पोलिसांच्या क्राइम ब्रँचने मेहुलला अटक केली.