रवी तेजा, राणा दग्गुबती, रकुल प्रीतसह १२ जणांना चौकशीसाठी ईडीची नोटीस
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
हैदराबाद / मुंबई, : अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, रवी तेजा आणि राणा दग्गुबतीसह १२ जणांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावले आहे. यामध्ये चार वर्षांपूर्वीच्या ड्रगशी संबंधित प्रकरणात टॉलिवूड स्टार्स आणि दिग्दर्शकांचा समावेश आहे. रकुल प्रीत सिंगला ६ सप्टेंबर, राणा दग्गुबतीला ८ सप्टेंबर, तर रवी तेजाला ९ सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
२०१७ मध्ये तेलंगणा उत्पादन शुल्क विभागाने ३० लाख रुपयांची ड्रग्स जप्त केल्यानंतर १२ गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी ११ प्रकरणांमध्ये अंमली पदार्थ तस्करांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या प्रकरणाच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केला होता.