संत साहित्य-वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या लेखिका गेल्या - छगन भुजबळ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नाशिक : मूळच्या अमेरिकेच्या असलेल्या पण फुले-शाहू-आंबेडकर अभ्यासताना भारतात येऊन इथल्या मातीशी एकरुप होऊन. बुद्ध-फुले-आंबेडकर-मार्क्स यांच्या तत्वज्ञानाची अभ्यासपूर्वक मांडणी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ,श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या, डॉ गेल ऑम्व्हेट यांचे निधन झाले. त्यांना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
आपल्या श्रद्धांजली संदेशात छगन भुजबळ म्हणतात की, गेल ऑम्व्हेट साधारणतः ५० वर्षांपूर्वी भारतात आल्या. भारतात आल्यानंतर त्यांनी येथील सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यास केला. संशाधन करीत असताना त्या कष्टकऱ्यांच्या चळवळींचा एक भाग बनून गेल्या. त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी केला. त्यासाठी त्यांनी सामाजिक क्षेत्रात संघर्ष करणा-या, लढणाऱ्या माणसांच्या चळवळींचा वैचारिक पाया भक्कम केला. त्यांच्या लढ्याच्या अग्रभागी राहिल्या. फक्त ज्ञानच नव्हे तर त्यांनी त्यांचे संपुर्ण आयुष्य कष्टकरी माणसांच्या चळवळीसाठी समर्पित केले. जातिव्यवस्थेवर त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध माध्यमांतून आपले मत ठामपणे मांडले. भारतीय समाजक्रांती मार्क्सवाद, फुले आंबेडकरवाद आणि स्त्रीवादाच्या पायावरच शक्य आहे, असा विचार त्यांनी मांडला आहे. विचार आणि व्यवहारात फारकत होणार नाही, याची त्यांनी नेहमी जाणीव ठेवली.
यावेळी श्री. भुजबळ म्हणले की डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे कार्य पाहून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले महात्मा फुलेंच्या विचारांचा मोठा पगडा त्यांच्यावर होता. कष्टकरी जनतेच्या लढ्यात कायम अग्रभागी असणाऱ्या डॉ. गेलं ऑम्व्हेट यांनी दलित, आदिवासी, मागासवर्गीय समाजासाठी मोठे लिखाण केले. दुर्दैवाने ८१ व्या वर्षी कासेगाव येथे त्यांचे निधन झाले. मी माझ्यावतीने व अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.