भारतात 24 तासात 2,81,386 नवे कोरोना रुग्ण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 2,81,386 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 4,106 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 3,78,741 नागरिक बरे झाले आहेत.
भारतात कोरोनाचे 2,49,65,463 रुग्ण झाले असून एकूण 2,11,74,076 नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 35,16,997 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 2,74,390 आहे.
आतापर्यंत देशात 18,29,26,460 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 15,73,515 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 31,64,23,658 चाचण्या घेण्यात आल्या.
हिंदुस्थान समाचार