रोहित शर्मा 7 वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी खेळणार
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज रोहित शर्मा हा एकदिवसीय आणि टी ट्वेन्टी सामन्यांत धोकादायक फलंदाज मानला जातो, परंतु त्याने कसोटी क्रिकेटमध्ये बराच संघर्ष केलाय आणि अजूनही करतो आहे.गेल्या काही काळापासून कसोटी संघात सलामीवीर म्हणून आपली जागा तो पक्की करतोय. रोहितसाठी आगामी इंग्लंड दौरा आव्हानात्मक आणि तितकाच संघर्षपूर्ण असेल. रोहित शर्मा 7 वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC 2021) अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तो टीम इंडियाचा सदस्य आहे. (Rohit Sharma to play test match in England After 7 year)
रोहितचा 2014 नंतर पहिलाच इंग्लंड दौरा
इंग्लंड दौर्यापूर्वी रोहितचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी भारतीय सलामीवीरांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. रोहित शर्मा 2014 नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणार आहे. 2014 साली रोहित सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. 2014 सालच्या इंग्लंड दौऱ्यात रोहित शर्माचा 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत तिसर्या कसोटीत भारतीय संघात समावेश झाला होता. रोहितने त्या सामन्यात 34 धावा केल्या. पहिल्या डावांत त्याने 28 आणि दुसऱ्या डावांत त्याने 6 धावा केल्या. त्यानंतर 2019 पासून रोहित कसोटीत सलामीवीर म्हणून भारतीय संघात खेळत आहे आणि त्याची कामगिरीही चांगली झाली आहे.
रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड काय म्हणाले?
“रोहित इंग्लंडमध्ये चांगली फलंदाजी करेल”, असा विश्वास रोहितचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी व्यक्त केलाय. तसंच भारतीय सलामीवीरांनी डावाची सुरुवात करताना अधिक संयमाने खेळण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. स्पोर्ट्स कीडाशी बोलताना ते म्हणाले, रोहितने बर्याच सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली होती, परंतु त्या खेळीला मोठ्या स्कोअरमध्ये रुपांतर करण्यात त्याला अपयशी आलं.
“रोहितने डावाच्या सुरुवातीला अधिक लक्ष केंद्रित करुन फलंदाजी करणे आवश्यक आहे. यामुळे इंग्लंडमध्ये त्याला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत होईल”, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी रोहितला दिलाय. पुढे बोलताना लाड म्हणाले, “रोहितने ऑस्ट्रेलियामध्ये फलंदाजी करताना सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांसमोर तो सहज खेळला. तो बाद होईल असा विचारही मनात येत नव्हता पण बर्याच डावात त्याने नाहक विकेट फेकली त्याला मोठ्या खेळी करण्यात अपयश आलं”.
कुस्तीपटू सुशील कुमार रेल्वे सेवेतून निलंबीत
कुस्तीपटू सागर धनकर (Sagar Dhankar) यांच्या हत्येप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या सुशील कुमारला पुढील सूचना येईपर्यंत रेल्वेने नोकरीवरून निलंबित केले आहे. उत्तर रेल्वे सीपीआरओ दीपक कुमार यांनी सांगितले की, "सुशील कुमार विरोधात फौजदारी गुन्ह्यांचा तपास सुरू असल्यामुळे त्यांना नोकरीवरून निलंबित केले आहे."