दिलगिरीनंतरही विनेश जागतिक स्पर्धेला मुकणार?
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : निलंबित कुस्तीपटू विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाकडे दिलगिरी व्यक्त करणारे पत्र पाठवले आहे. मात्र तरीही जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पध्रेसाठी तिचा संघटनेकडून विचार केला जाणार नाही.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये विनेशचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. परंतु भारतीय संघासमवेत सराव आणि निवास न करणे, वैयक्तिक पुरस्कर्त्यांचे नाव जर्सीवर वापरणे आणि भारतीय पथकाच्या अधिकृत पुरस्कर्त्यांचे नाव टाळणे, असे ठपके तिच्यावर ठेवण्यात आले आहेत. स्पध्रेदरम्यान शारीरिक आणि मानसिक पातळीवर संघर्ष करीत होते, असे स्पष्टीकरण विनेश दिले आहे. याशिवाय स्पध्रेसाठी फिजिओसुद्धा देण्यात आला नव्हता, असे तिने म्हटे आहे. विनेशने शुक्रवारी संघटनेच्या नोटिशीला उत्तर दिले आहे.