मिल्खाजी, तुम्ही आमच्यात कायम जिवंत राहाल - फरहान अख्तर
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भारताचे महान माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने दुःखी झालेल्या अभिनेता फरहान याने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
त्याने लिहिले आहे की, प्रिय मिल्खा जी...तुम्ही हे जग सोडून गेलात हे वृत्त मन मान्यच करत नाही आहे. कधी ही हार न मानण्याची जिद्द मला तुमच्या कडूनच मिळाली. खरं हेच आहेकी तुम्ही आमच्यात कायम जिवंत राहाल. कारण तुम्ही फार प्रेमळ, दयाळू व्यक्ती होता. कल्पना, स्वप्न, जिद्द, प्रामाणिकपणा याच्या जोरावर आकाशालाही स्पर्श करू शकतो हे तुम्ही दाखवून दिले. ज्या व्यक्ती तुम्हाला ओळखतात त्यांना मिळालेला हा आशिर्वाद आहे. तर ज्या व्यक्ती तुम्हाला भेटल्या नाहीत त्यांच्यासाठी तुमचे कार्य कायमच प्रेरणा ठरेल. तुम्हाला खूप खूप प्रेम. अभिनेता फरहान अख्तरने मिल्खा सिंग यांची बायोपिक असलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली होती.