रायगड : डेल्टा प्लसमुळे दोन जणांचा मृत्यू
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
रायगड, : राज्यात कोरोनानंतर आता डेल्टा प्लसच्या रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात डेल्टा प्लसमुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात डेल्टा प्लसमुळे आज दोन जणांचा मृत्यू झाला. जूनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये डेल्टा प्लसने महिलेचा मृत्यू झाला होता. दिवसेंदिवस वाढत्या रूग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या आतापर्यंत ६५ वर पोहोचली आहे.नव्याने आढळलेल्या २० रुग्णांपैकी मुंबईत ७, पुण्यात ३, नांदेड २, गोंदिया २, रायगड २, पालघर २, तर चंद्रपूर आणि अकोला प्रत्येकी १ रुग्णांचा समावेश आहे.