राज्यांना 26.68 कोटींपेक्षा अधिक कोरोना लसी प्रदान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्यांना 26.68 कोटींपेक्षा अधिक कोरोना लसी प्रदान

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत  केंद्र सरकारकडून मोफत आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत 26.68 कोटींपेक्षा जास्त -26,68,36,620 लसींच्या मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या आहेत. सोमवारी  सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार,वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 25,27,66,396 मात्रा देण्यात आल्या आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 1.40 कोटींपेक्षा जास्त (1,40,70,224) मात्रांचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय येत्या 3 दिवसात लसीच्या 96,490 मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना प्राप्त होतील.

केंद्र सरकारच्या नूतन घोषणेनंतर 21  जूनपासून 18-44 वयातील  सर्व नागरिकांच्या लसीकरण अभियानास पुन्हा एकदा वेग प्राप्त होणार आहे. देशव्यापी कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा तिसरा टप्पा 1 मे पासून सुरु झालेला आहे. अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या 18-44 सर्व नागरिकांना लस उपलब्ध केली जात आहे. याद्वारे मोठ्या आणि व्यापक स्वरूपात लसीकरणाचा शुभारंभ झाला आहे. पात्र नागरिक लसीकरणासाठी http://Cowin.gov.in.  या संकेतस्थळावर डिजिटल नोंदणी करू शकतात.