टूथपेस्ट ऐवजी विष तोंडात जाऊन तरुणीचा मृत्यू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टूथपेस्ट ऐवजी विष तोंडात जाऊन तरुणीचा मृत्यू

मुंबई : टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने धारावीतील अफसाना खान नामक तरुणीचा (वय १८) मृत्यू झाला आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अफसाना शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे ब्रश करण्यासाठी गेली. अर्धवट झोपेत असल्यामुळे तिने टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याचे औषध घेतले. नजरचुकीने हा प्रकार घडला. जी तिने चुकून ब्रशला लावली आणि आपले दात घासण्यास सुरुवात केली. ब्रश करता करता वासावरून तिला आपण टूथपेस्टऐवजी दुसरच काहीतरी असल्याचे जाणवले. मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. तिच्या शरीरात विष भिनायला सुरुवात झाली होती. त्यामुळे तिला उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला. या सर्व प्रकाराने कुटुंबाला धक्का बसला आहे.