महाडमध्ये सापडले २९ लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई, : पूरग्रस्त भागात साथीचे रोग पसरू नयेत म्हणून आरोग्य विभागाच्या डॉक्टर प्रयत्न करत आहेत. मात्र कोकणात लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळण्याची भीती आरोग्य विभागाच्या डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महाड तालुक्यात लेप्टोस्पायरोसिसचे ५९ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांची एलायझा चाचणीत केल्यानंतर त्यातील २९ जणांना लेप्टोस्पायरोसिस झाल्याचे समजले आहे.कुत्रा, डुक्कर, उंदीर आदी प्राण्यांचे मूत्र रस्त्यावर साठलेल्या पाण्यात मिसळून त्यातून लेप्टोस्पायरोसिस हा आजार होतो. त्यामुळे पूरग्रस्त भागात हा रोग पसरण्याची अधिक भीती असते. मुंबई बरोबर कोकणातील किनारपट्टी भागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर पट्ट्यात लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळून येतात.यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डॉक्सीसाक्लीनच्या गोळ्या देण्यात येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.