'टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याची ताकद ठेवा', वडेट्टीवारांचा चंद्रकांतदादांना टोला
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेचा सोपान गाठता आला नाही. निवडणुकीदरम्यान भाजप नेत्यांनी 205 जागा जिंकण्याचा दावा केला होता. त्यावरुन काँग्रेस नेते, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय. बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर पाटील डिस्टर्ब झाले आहेत. टीका करण्याची आवड असेल तर टीका सहन करण्याचीही ताकद असायला हवी, असा टोलाही वडेट्टीवारांनी पाटलांना लगावला आहे. निवडणुकांचे योग्य नियोजन केलं असतं तर कोरोना वाढला नसता. 5 राज्याच्या निवडणुका जिंकण्याच्या हव्यासापोटी देशात बिकट स्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. महाराष्ट्रानं आकडे लपवले नाहीत. इतर राज्यांनी आकडे लपवले, असंही वडेट्टीवार म्हणाले. राज्य सरकारने साडे सहा हजार कोटी रुपये कोरोना लस आणि ऑक्सिजन खरेदीसाठी ठेवले आहेत. आता केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला किती मानतं हे पाहावं लागेल. लाखोंच्या संख्येनं रुग्ण मिळत असूनही लॉकडाऊन का घोषित केला जात नाही? असा सवालही वडेट्टीवार यांनी केंद्राला विचारलाय.
अदर पुनावाला प्रकरणाची चौकशी व्हायला हवी
केंद्र सरकारचं लसीकरणाचं नियोजन बिघडलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला मोठी चपराक दिली आहे. सामुहिक जबाबदारीने संकटावर मात करण्याची तयारी न दाखवता फक्त घोषणा केली जाते. नागपुरात कोरोनाचे 5 स्ट्रेन पाहायला मिळाले आहेत. अदर पुनावाला प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. आशिष शेलार यांनी अदर पूनावाला यांना कुणी धमकावलं याचा भांडाफोड करावाच, असं आव्हानही वडेट्टीवार यांनी केलंय.