जूनमध्ये सुवर्ण कर्ज आणि वाहन कर्ज वाढले, वैयक्तिक कर्जामध्ये झाली 11.9% वाढ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली :
जूनमध्ये, जेव्हा कोविड संक्रमणाची दुसरी लाट चालू होती, तेव्हा गेल्या वर्षीच्या तुलनेत 11.9% अधिक वैयक्तिक कर्ज घेण्यात आले. यात सुवर्ण कर्ज आणि वाहन कर्जाचे आकडे आहेत, त्यामुळे एक प्रकारचा विरोधाभास निर्माण होत आहे.
म्हणजेच, कोविड किंवा इतर समस्यांमुळे लोकांनी सोन्याचे दागिने गहाण ठेवून जूनमध्ये अधिक कर्ज घेतले, परंतु त्याच महिन्यात लोकांनी वाहने खरेदी करण्यासाठीही अधिक कर्ज घेतले.
या गोष्टी रिझर्व्ह बँकेच्या सेक्टरल डिप्लॉयमेंट ऑफ बँक क्रेडिट - जून 2021 च्या रिपोर्टमधून कळतात. RBI च्या अहवालानुसार, वैयक्तिक कर्जाची वार्षिक वाढ गेल्या वर्षी जूनमध्ये 10.4% होती.
जूनमध्ये नॉन फूड बँक कर्जामध्ये 5.9% वाढ झाली
33 व्यापारी बँकांकडून बँक कर्जाचा डेटा गोळा करण्यात आला आहे, ज्यांनी जवळजवळ 90% कर्ज नॉन-फूड क्रेडिट म्हणून वितरित केले. जर आपण नॉन-फूड बँक कर्जामध्ये वार्षिक वाढ बघितली तर लक्षात येईल की जूनमध्ये ती 5.9% वाढली आहे, जी एक वर्षापूर्वी 6.0% होती.
बँक कर्ज वाढीतील चांगली गोष्ट म्हणजे या दरम्यान, कृषी आणि संबंधित कामांसाठी वार्षिक आधारावर 11.4% अधिक कर्ज घेतले गेले. गेल्या वर्षी, कोविडच्या सुरुवातीला म्हणजे जूनमध्ये 2.4% वाढ झाली होती.
उद्योगासाठी बँक कर्जामध्ये 0.3% कपात
यावर्षी जूनमध्ये उद्योगाला मिळालेल्या बँक कर्जामध्ये वार्षिक आधारावर 0.3% घट झाली, परंतु गेल्या वर्षी जूनमध्ये यात वार्षिक आधारावर 2.2% वाढ झाली होती. मध्यम उद्योगांना जूनमध्ये 54.6% अधिक कर्ज मिळाले, गेल्या वर्षी 9% ची घट झाली होती.
सूक्ष्म आणि लघु उद्योगांना (MSMEs) मिळालेल्या बँकेच्या कर्जामध्ये वार्षिक आधारावर 6.4% ची वाढ झाली, तर वर्षभरापूर्वी जून मध्ये 2.9% ची घट झाली होती. या जूनमध्ये, मोठ्या कंपन्यांना 3.4% कमी कर्ज मिळाले, जे मागील वर्षी याच कालावधीत त्यांना 3.6% अधिक कर्ज मिळाले होते.
सेवा क्षेत्रातील कर्जाची वाढ कमी होऊन 2.9% राहिली
व्यावसायिक रिअल इस्टेट, एनबीएफसी आणि पर्यटन, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सकडून कमी मागणीमुळे सेवा क्षेत्राची कर्जाची वाढ कमी होऊन 2.9% राहिली, जी गेल्या वर्षी जूनमध्ये 10.7% होती.
चांगली गोष्ट म्हणजे, MSME ला मदत पॅकेज म्हणून ऑफर केलेली सरकारी सपोर्टवाली इमर्जेंसी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) ते इंडस्ट्रीच्या लोन ग्रोथमध्ये वाढ झाली, अन्यथा ते निगेटिव्ह झाले असते.