अभिनेत्री दिया मिर्झाने गरोदर महिलांना दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
भिनेत्री दिया मिर्झा लवकरच आई होणार आहे. गरोदरपणातील हा काळ ती सध्या चांगलाच एन्जॉय करतेय. दिया मिर्झा सोशल मीडियावर ही चांगलीच सक्रिय असते. विविध फोटो आणि पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच दिया मिर्झा ने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गरोदर महिलांनी करोना वरील लस घ्यावी की नाही याबद्दलची महत्वाची माहिती दिली आहे.
सध्या देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. मात्र अनेकांमध्ये लस घेण्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाले आहेत.एका महिलेने कोविड प्रोटोकॉलची माहिती दिली होती.करोनाच्या दुसर्या लाटेत नव्या इंफेक्शनपासून बचाव करण्यासाठी गरोदर महिलांनी करोना वरील लस घ्यावी अशी माहिती दिली या महिलेने दिली होती. यावर दिया मिर्झाने प्रतिक्रिया देत गरोदर महिलांना योग्य माहिती दिली आहे.
ट्वीटमध्ये दिया म्हणाली,”हे खूप महत्त्वाचं आहे. वाचा आणि लक्षात ठेवा की भारतात सध्या ज्या लसीचा वापर केला जात आहे त्यापैकी कोणत्याही लसीची गरोदर महिला किंवा स्तनपान करणाऱ्या महिलेवर टेस्ट केलेली नाही. वैद्यकीय चाचणी झाल्याशिवाय आपण यापैकी कोणतीही लस घेऊ शकत नाही असं माझ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे.” ही महत्त्वाची माहिती शेअर करत दिया मिर्झाने गरोदर महिलांना सावध केलं आहे.