पेण पूर्व विभागातील किराणा दुकानदाराकडून नागरिकांची लुटमार सुरूच
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
पेण: राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला मात्र सामान्य जनतेची उपासमारीची वेळ येऊन नये या करता राज्य शासनाने जीवनावश्यक वस्तूसाठी ७ ते११ यावेळेत नागरिकांना किराणा, भाजीपाला खरेदी करण्यासाठी मुभा दिली परंतु किराणा दुकानदार नियमाचे पालन न करता राजरोसपणे दुकानाच्या पाठीमागच्या सेटर मधून किराणा दुकानदार राजरोसपणे विक्री करत असल्याचे पूर्व विभागात पहावयास मिळत आहे.
तालुक्यात कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे तरी सुद्धा किराणा दुकानदार नियम धाब्यावर बसवत आहेत. विशेष करून वरसई भागात किराणा मालावर भरमसाठ पैसे घेत असल्याने पुर्व विभागातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.या भागात किराणा दुकानात प्रत्येकजण वेगवेगळे भाव लावत आहेत तसेच ,चढ्या भावाने विक्री होत आहे. किराणा दुकानात तंबाखू, गुटखा विक्री करण्यास बंदी आहे तरी सुद्धा येथील किराणा दुकानामध्ये तंबाखू, गुटखा विक्री सुद्धा राजरोसपणे चढ्या भावाने विकत आहेत तसेच भाजीपाला विक्रेते आवच्यासवा किंमतीने भाजी विकत आहेत त्यामुळे आदिवासी बांधवांची खूप मोठी लूट अथवा फसवणूक होत आहे या भागात लॉकडाऊन काळात सध्या कामे पुर्ण ठप्प झाले आहेत त्यात असे किराणा, भाजीपाला विक्रेते भरमसाठ पैसे घेत असल्याने रोजच्या रोज पैसे आणायचे कुठून असे आदिवासी बांधव संताप व्यक्त करत आहेत या भागातील किराणा दुकानदार चढ्या भावाने विक्री होत असल्यास संबंधीत आधिकारी कोणती कारवाई करतील याकडे सर्वच लक्ष लागले आहे .