नोकरभरती व संचमान्यता मार्गी लावण्यास प्राधान्य - वर्षा गायकवाड
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
अहमदनगर :- शारीरिक शिक्षण शिक्षकाच्या जागा असतानाही संचमान्यतेतील बदललेल्या निकषामुळे भरती होऊ शकली नाही.संचमान्यतेचे मागील शासन निर्णय रद्द करून संचमान्यतेच्या निकषात काळा नुरूप बदल करावा व नवीन निकषांच्या आधारे शाळा तेथे शारीरिक शिक्षक या प्रमाणे बायफोकल पद्धतीने नोकर भरती करण्यात यावी,अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य कोअर कमिटी सदस्य तथा आदर्श शिक्षक प्रमोद पाटील,राज्य समन्वयक मच्छींद्र ओव्हळ व शिष्टमंडळाने केली.या वेळी चर्चा करून निवेदन देण्यात आले.
संचमान्यता, नोकरभरती या बाबत शासन सकारात्मक असून प्राधान्यक्रमाने हे विषय मार्गी लावू व लवकरच या संदर्भात संघटनांच्या पदाधिकार्यां समवेत बैठक घेऊ असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिष्टमंडळास दिले. मागील नऊ वर्षात शारीरिक शिक्षकांच्या नऊ जागाही भरल्या नाहीत. त्यामुळे बेरोजगार खेळाडू, पदवीधरांची संख्या वाढत चालली असून नैराश्येतून एमपीएससीच्या विद्यार्थ्या प्रमाणे टोकाचा निर्णय घेऊ शकतात, त्यामुळें शिक्षकभरती तातडीने करण्यात यावी, संचमान्यतेतील त्रुटी दूर करून नवीन निकष लागू करून शारीरिक शिक्षण शिक्षकाला संचमान्यतेत सामावून घेण्यात यावे, निवडश्रेणीसाठी अटीत बदल करण्यात यावा, नवीन शैक्षणिक धोरण समितीत शारीरिक शिक्षण शिक्षक प्रतिनिधी असावा या सह विविध मागण्यांचे निवेदन शिक्षणमंत्र्यांना सादर केले. या वेळी सविस्तर चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिले.