राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : अश्लील फिल्म निर्मिती प्रकरणी राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रेयान थोरपे या दोघांच्या पोलीस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कुंद्राच्या बेकायदेशीर उद्योगांबद्दल अधिकचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली असता ती न्यायालयाने मान्य केली आहे.
दरम्यान पोलिसांनी न्यायालयासमोर दिलेल्या माहितीनुसार, राज अश्लील कंटेट आणि पोर्नोग्राफीची निर्मिती करायचा आणि ते वितरीत करण्यासाठी दररोज व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करायचा. पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी राजसह त्याचा साथीदार आणि मुख्य आरोपी उमेश कामत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. या दोघांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. या चौकशी दरम्यान गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी राजच्या घरी छापा घातला. या छाप्यामधून त्यांनी घरातील सर्व्हर आणि उमेश कामतने तयार केलेले ७० पॉर्न व्हिडिओ जप्त केले आहेत.
तपासात समोर आलेल्या बाबी
मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व व्हिडिओ वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसच्या मदतीने बनवण्यात आले होते. त्याशिवाय हॉट शॉट ॲपवर अपलोड केलेले २० ते ३० मिनिटांचे सुमारे ९० व्हिडिओ देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. हे व्हिडिओ उमेश कामतने युकेमधील प्रॉडक्शन कंपनी केनरिनला पाठवले होते. पोलिसांनी सर्व्हर जप्त केले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहे. त्यातून केनरिनसाठी पॉर्नोग्राफी मटेरिअल अपलोड केले जात होते की नाही हे समजू शकणार आहे. दरम्यान, आपण पॉर्न व्हिडिओ नाही तर अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या इरॉटिक व्हिडिओप्रमाणेच व्हिडिओ तयार करत असल्याचा दावा राज सातत्याने करत आहे.
दरम्यान, राज कुंद्राचा साथीदार आणि आयटी हेड रायन थार्प याने पॉर्न व्हिडिओ तयार करत असल्याचे मान्य केले आहे. तसेच या पूर्ण रॅकेटचा सूत्रधार कुंद्राच असल्याचेही त्याने सांगितले आहे. तसेच रायनचं काम केवळ कोणत्या तांत्रिक गोष्टींची काळजी घेत, कायद्यापासून पळवाट काढता येईल हे सांगायचे होते.
पोलिसांनी राज कुंद्राचे वियान इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एलजी स्ट्रीमिंग या दोन्ही कार्यालयांवर पोलिसांनी छापे घातले आहेत. पोलिसांच्या मते या प्रकरणातील आरोपींनी नवोदित मॉडेल, अभिनेत्री आणि अन्य मुलींच्या असहाय्य स्थितीचा फायदा घेत त्यांना अश्लिल सिनेमांमध्ये काम करण्यास भाग पाडले. हे सर्व चित्रीकरण मुंबईत बंगले भाड्याने घेऊन केले जायचे.