सिद्धार्थ-अजयच्या ‘थँक गॉड’च्या निर्मात्यांना कोरोनामुळे सोसावे लागले मोठे नुकसान
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
कोरोनाच्या दुस-या लाटेने देशात हाहाकार माजला आहे. अशात बॉलिवूड इंडस्ट्रीलाही मोठा धक्का बसला आहे. अनेक निर्मात्यांना कोट्यवधीचे नुकसान सहन करावे लागत आहे. आता सिद्धार्थ मल्होत्रा, अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह स्टारर थँक गॉड या चित्रपटालादेखील मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित ‘थँक गॉड’ चित्रपटाचे कोरोनामुळे शूटिंगही रखडले आहे. हा एका डॅनिश चित्रपटावर आधारित आहे. जानेवारीमध्ये निर्मात्यांनी मुंबईत चित्रपटाचा मुहूर्त शाॅट केला होता.
‘मिशन मजनू’चे लखनऊ शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर एप्रिलमध्ये ‘थँक गॉड’चे शूटिंग करण्याची प्लानिंग होती. मात्र कोरोनाच्या दुस-या लाटेनेमुळे तसे झाले नाही. ठरलेल्या सर्व योजना रद्द कराव्या लागल्या.
2 कोटींचे नुकसान
निर्मात्यांना आधीच 2 कोटीचे नुकसान झाले आहे. चित्रपटासाठी एक भव्य सेटवर आधीपासूनच फिल्मसिटीमध्ये बनवण्यात आला होता. मात्र आता ते शूटिंग थांबवण्यात आले आहे. रोज सेटचा किराया द्यावा लागणार आहे किंवा ते डिसमेंटल केले जाऊ शकते. हा सुमारे दोन कोटीचा खर्च आहे.