देशात दरदिवशी एक कोटी लस उपलब्ध झाली पाहिजे - नवाब मलिक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई : देशात दरदिवशी एक कोटी लस उपलब्ध झाली पाहिजे तर महाराष्ट्रात दरदिवशी २०-२५ लाख लोक लसीच्या दुसर्या डोससाठी प्रतिक्षेत आहेत त्यामुळे देशात एका दिवसात एक कोटीचा लसीचा टप्पा पूर्ण करण्यात आला हा मोठेपणाचा विषय नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
देशात एका दिवसात एक कोटी लसीचा टप्पा पूर्ण करण्यात आला तसाच महाराष्ट्रात एका दिवसात ११ लाख लोकांना लस देण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या डोसच्या लसीचा साठा राज्यसरकारला गरजेचा आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान केरळ व महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या दोन राज्यात जास्तीत जास्त लस साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.