देशात 24 तासात 40 हजार नवे कोरोनाग्रस्त
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 40 हजार 120 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 585 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसाआधी 41 हजार 195 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. काल दिवसभरात देशात 42 हजार 295 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 21 लाख 17 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 30 हजार 254 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 13 लाख 2 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाबाधितांचा सक्रिय रुग्णांची संख्या आता 4 लाखांहून कमी झाली आहे. एकूण 3 लाख 85 हजार रुग्ण अजूनही कोरोनावर उपचार घेत आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यासोबतच महाराष्ट्रात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. देशात गुरुवारी 6,388 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 390 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 75 हजार 10 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.8टक्के आहे.