अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’ चित्रपटाची शूटिंग सुरू होणार
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
जून महिन्यापासून फिल्म इंडस्ट्री पुन्हा कामावर परतणार आहे. 'विक्रम वेधा', 'असुर 2', 'मसाबा मसाबा 2' ची
तयारी पूर्ण झाली आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारच्या ‘राम सेतु’ चित्रपटाची शूटिंगही 20
जूनपासून सुरू होऊ शकते. निर्माते विक्रम मल्होत्रा यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले, 'अक्षय कुमार
आता कोविडपासून पूर्णपणे बरा झाला आहे. तो अगदी ठणठणीत आहे. सध्या मुंबईतच शुटिंग सुरू होणार आहे.
सध्या तरी मुंबईबाहेर शूटिंग करण्याची कोणतीही योजना नाही. सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत जाण्याची शक्यता आहे,'
असे त्यांनी सांगितले.
चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की , 'मागील एका महिन्यापासून निर्माते, दिग्दर्शक आणि व्हीएफएक्स टीम
झूम कॉलवर आपापले प्रेझेंटेशन शेअर करत आहेत. फिल्मसिटी येथे गुफांचे सेट तयार करण्यात आले आहेत.
त्याद्वारे चित्रपटाचा नायक राम सेतूच्या ठिकाणी पोहोचलेला दाखवला जाईल. 'राम सेतु' हेवी व्हीएफएक्स
असलेला चित्रपट असेल. चित्रपटात बरेच अंडरवॉटर सीक्वेन्स चित्रित केले जाणार आहेत. कलाकार पाण्याखाली
जाऊन शूटिंग करतील.' चित्रपटाचे चित्रीकरण अनेक ठिकाणी केले जाणार होते. टीम ऊटीला देखील जाणार होती,
परंतु कोविड परिस्थितीमुळे वेळापत्रक रद्द करावे लागले. कलाकार आणि क्रू मेंबर्स सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये
श्रीलंकेला रवाना होतील. या चित्रपटात तामिळ फिल्म इंडस्ट्रीचा मोठा स्टारदेखील असणार आहे. पण सध्या
त्याच्या नावावर गुप्तता बाळगण्यात आली आहे. सध्या तेलुगु अभिनेता सत्यदेवचे नाव समोर आले आहे.