“तिचीच चूक असणार!
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
एकीकडे उत्साहात गणपतीचे आगमन होत असतांना दुसरीकडे मन सुन्न करणारी घटना घडली. मुंबईतील साकीनाका येथे महिलेवर बलात्कार करण्यात आला आणि यावेळी आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. पण तिचा २ दिवसापूर्वी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रत्येक स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. अगदी राजकारणी ते सेलिब्रिटी आणि सामान्य माणसांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच तिच मत स्पष्टपणे सर्वांसमोर मांडत असते. यावेळी देखील तिने या प्रकरणात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना मांडल्या आहेत. हेमांगीने फेसबूकवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हेमांगीने संताप व्यक्त केला आहे.
काय आहे हेमांगीची पोस्ट?
हेमांगीने फेसबूकवर ही पोस्ट शेअर केली आहे. आरोपी कोणीही असला तरी जाब मात्र महिलेलाच विचारला जातो यावर तिने पोस्ट लिहली आहे. “आणखी एक! तिचीच चूक असणार! तिचे कपडे चुकले असतील! एवढ्या रात्री ती काय करत होती? एकटी होती की कुणासोबत होती? तिची जात काय, धर्म काय, कुठे काम करत होती? किती कमवत होती? लग्न झालेली होती, अविवाहित होती, घटस्फोटीत होती, मुलं बाळं किती? ती मुंबईची की आणखी कुठली! सगळं सगळं तीचंच चुकलं असणार!चला आता आपण तिलाच आणखीन घाबरऊन ठेऊया! बाकी त्याला कसलंच बंधन नको, सगळी सूट देऊया! काय?” अशी पोस्ट लिहित हेमांगीने संताप व्यक्त केला आहे. तिने अतिशय गंभीर गोष्टीवर भाष्य केलं आहे.