भारतात 24 तासात 3,26,098 नवे कोरोना रुग्ण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 3,26,098 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 3,890 नागरिकांचा मृत्य झाला आहे. 3,53,299 नागरिक बरे झाले आहेत.
भारतात कोरोनाचे 2,43,72,907 रुग्ण झाले असून एकूण 2,04,32,898 नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 36,73,802 झाली आहे. देशात मृतांचा आकडा 2,66,207 आहे.
आतापर्यंत देशात 18,04,57,579 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 16,93,093 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 31,30,17,193 चाचण्या घेण्यात आल्या.