केंद्र सरकारकडून राज्यांना 17.49 कोटींहून अधिक कोरोना लसीच्या मात्रा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली: प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने समन्वित दृष्टिकोनाचा अवलंब करत केंद्र सरकार कोरोना विरोधी लढाईत आघाडीवर आहे. या महामारीचा प्रतिबंध करण्यासाठी तसेच त्याच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या चाचण्या, रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविडला प्रतिबंध करणारी वर्तणूक याबरोबरच लसीकरण हा या महामारी विरोधातल्या व्यवस्थापनातला भारत सरकारच्या पंच सूत्री धोरणाचा अविभाज्य भाग आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 17 कोटी 49 लाखांहून जास्त मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरविल्या आहेत. सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, वाया गेलेल्या मात्रांच्या संख्येसह एकूण 16,65,49,583 मात्रा वापरण्यात आल्या आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांकडे अजूनही कोविड प्रतिबंधक लसीच्या 84 लाखांहून जास्त मात्रा शिल्लक आहेत.याशिवाय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना यापूर्वी पुरवण्यात आलेल्या मात्रांव्यतिरिक्त 53 लाखांहून अधिक मात्रा, येत्या 3 दिवसांत पुरविण्यात येणार आहेत.