टोकियो ऑलिम्पिक : पदक जिंकणाऱ्यांचा बीसीसीआय करणार सन्मान, देणार इतकी रोख रक्कम
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करणार आहे. अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
आपल्या देशाच्या खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये शानदार प्रदर्शन करत देशाचा गौरव केला आहे. त्यांच्या या कामगिरीचा सन्मान करताना आणि विजेत्यांना रोख रक्कम देताना बीसीसीआयला आनंद होत असल्याचे शाह यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे.
पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना मिळणार इतकी रक्कम
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णवेध घेणाऱ्या नीरज चोप्राला एक कोटी
सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या मीराबाई चानू आणि रवी दहिया यांना प्रत्येकी 50 लाख रुपये
ब्रॉन्झ मेडल जिंकणाऱ्या पीव्ही सिंधु, लवलीना बोरोहेन, बजरंग पुनिया यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचे बक्षीस
ब्रॉन्झ पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघासाठी 1.25 कोटी रुपयांचे बक्षीस.
हिंदुस्थान समाचार