रवी शास्त्रींच्या कोचिंगमध्ये 114 सामने जिंकली आहे टीम इंडिया
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचा प्रशिक्षक असू शकतो. जेव्हा
ही सिरीज खेळली जात असेल तेव्हा भारतीय टेस्ट टीम इंग्लंडमध्ये असेल. त्या टीमसोबत टीमचे नियमित कोच
रवी शास्त्री उपस्थित असतील.
या डेव्हलपमेंटनंतर आता राहुल शास्त्रीच्या जागी राहुल द्रविडची टीम इंडियाचा नियमित प्रशिक्षक पदावर
नियुक्ती करावी की नाही, यावर क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. चला या प्रश्नाचे उत्तर आपण रवी शास्त्री
यांच्या कार्यकाळात टीम इंडियाच्या कामगिरीतुन मिळवायचा प्रयत करू.
टीम इंडियाने जिंकले आहेत 114 सामने
जुलै 2014 मध्ये अनिल कुंबळे यांच्या जागेवर रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदावर नियुक्ती
करण्यात आली. त्यानंतर भारतीय संघाने 174 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात संघाने 114 सामन्यांमध्ये
विजय मिळविला. म्हणजेच शास्त्रींच्या कारकिर्दीत भारताचा एकूण सक्सेस रेट 65 टक्क्यांहून अधिक आहे.
38 पैकी 23 कसोटी सामने जिंकले
रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने 38 पैकी 23 कसोटी सामने जिंकले आहेत. सक्सेस रेट 60%
होता. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यात 76 पैकी 51 सामन्यात विजय मिळवला. सक्सेस रेट 67% होता.
त्याचप्रमाणे टी-20 मध्ये भारताने 60 पैकी 40 सामने जिंकले आहेत. सक्सेस रेट 66% होता. टेस्ट क्रिकेटमध्ये
20 किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यात टीम इंडियाची कोचिंग करणाऱ्यांमध्ये रवी शास्त्रींचा रेकॉर्ड सर्वात चांगला
आहे. वनडे क्रिकेटमध्येही त्यांचा सक्सेस रेट 20 पेक्षा जास्त सामन्यात कोचिंग करणाऱ्यांपेक्षा सर्वात जास्त आहे.